भगवी कफनी,भगवं मुंडासे आणि वाढलेल्या जठा अशा वेशातील साधूला तळीरामाच्या अवस्थेत बघून धर्मरक्षकांचा पारा चढला ही घटना रविवारी दुपारची…बेळगाव स्टँड जवळील एका बार मध्ये साधू सदृश्य व्यक्ती दारू घेताना आढळल्याने तिथे उपस्थित हिंदूवाद्यांनी त्या दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीस मारहाण केली.’तू हिंदू धर्माची मर्यादा घालवतोस का’ अशी विचारणा करत शिव्यांची लाखोली वाहत चांगलाच चोप दिला.
देशात भगवी धार्मिक वस्त्रे परिधान करून अनैतिक चाळे करणाऱ्या तथा कथित साधूंची संख्या भरमसाठ वाढली आहे, त्यामुळं जे सत्यावर आधारित साधुगिरी करतात त्यांची सुध्दा बदनामी होत आहे. म्हणूनच भगवी वस्त्रे परिधान करून बार मध्ये दारू खरेदी करणाऱ्याचा समाचार घेतला गेला. वास्तविक रित्या कुणाच्याही अंंंगावर हात टाकुन कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.
हे साधू प्रकरण पोलीसस्थानका पर्यंत पोहोचले असून,खुलेआम मारहाण करणाऱ्या त्या तथाकथित धर्मरक्षकांचा शोध घेतला जात आहे. भगव्या वस्त्रधारी व्यक्तीस वस्त्रधारी केवळ मारहाण करून गप्प न बसता, मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .त्यामुळं पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.साधूला साधुपण शिकवताना धर्म रक्षकांची जीभ घसरली आहे हे त्यांच्याही ध्यानात आलेलं नाही.
बोले तैसा चाले …त्याची वंदावी पाऊले ,अश्या व्यक्ती समाजातून हद्दपार झाल्यात की काय अशी शंका या साधुमय व्यक्तीच्या वर्तना मुळे समाजात निर्माण झाली आहे.