मराठा समाजाला आरक्षण ध्या बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाची सोडवणूक तात्काळ करा अश्या मागण्या साठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज (रविवारी) शिनोळी येथे रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दीड तासाहून अधिक काळ रस्ता रोको करून वाहन अडवण्यात आली होती.
बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अश्या घोषणा देत बेळगावसह चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रविवार असल्यामुळे अांबोली व इतर ठिकाणी जाणाऱ्या वाहनाच्या रांगा दोन्ही बाजूला लागल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी राजेच्या पुतळ्याला अभिवादन करुण कार्यकर्ते शिनोळी येथे दाखल झाले. रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिनोळी बंद ठेवण्यात आली होती. माजी आमदार मनोहर किणेकर, सकल मराठा समाजाचे प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील, कोल्हापुर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्राम सिंह कुपेकर,बेळगाव शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर,माजी आमदार मनोहर किणेकर, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, चंदगड शिव सेनेचे प्रभाकर खांडेकर,यांच्यासह हजोरो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.चंदगडचे तहसीलदार शिवाजी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.