अखेर बेळगावकरांचे स्वप्न पूर्ण होणार असून एअर इंडियाचे विमान बेळगाव विमान तळावरून झेप घेणार आहे. एअर इंडियाने 10 आगस्ट पासून एअर बस 319 हे विमान बंगळुरू बेळगाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पाईस जेट ची विमान सेवा मे पासून बंद झाल्या नंतर बेळगावातून केवळ तीनच दिवस अलायन्स एअर वेज विमान सेवा सुरू असते.मंगळवार बुधवार आणि शनीवार हे तीन दिवस विमानसेवा सुरू आहे.एअर इंडिया सेवा आठवड्यातुन चार दिवस असणार आहे त्यामुळं अलायन्स आणि एअर इंडिया मिळुन बेळगाव बंगळुरू अशी दररोज विमान सेवा उपलब्ध होणार आहे.सोमवार गुरुवार शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस बेळगाव बंगळुरू अशी सेवा उपलब्ध असणार आहे.
बंगळुरू ते बेळगाव-सकाळी 7 ते 8:30
बेळगाव ते बंगळुरू-सकाळी 9 ते 10:20
राज्य सभा सदस्य डॉ प्रभाकर कोरे यांनी एअर इंडिया विमान सेवे बद्दल माहिती दिली.एअर इंडियाचे विभागीय मुख्य संचालक एम व्ही जोशी यांनी सिटीजन कौन्सिलला आगस्ट मध्ये एअर इंडिया चे विमान झेप घेईल असं आश्वासन दिलं होतं.सिटीजन कौन्सिल सतीश तेंडुलकर यांनी जोशी यांना निवेदन देऊन एअर इंडिया विमान सेवा सुरू करा अशी मागणी केली होती.
एअर इंडियाची 319 एअर बस बेळगाव मधून सुरू झाल्याने मोठी विमान या निमित्ताने बेळगावला उतरवणे सुरुवात होईल हे सुचिन्ह म्हणावं लागेल अशी प्रतिक्रिया बेळगाव विमान तळाचे प्रमुख अधिकारी राजेश कुमार मौर्य यांनी दिली.
विमान तळाचे विस्तार करणं झाल्यावर पहिल्यांदाच 319 एअर बस सारखी मोठी विमान बेळगाव विमान तळावर उतरणार आहेत.
एअर इंडिया ने आपल्या सर्व्हे अनुसार बेळगाव मुंबई आणि इतर ठिकाणी देखील विमान सेवा लवकरच सुरू करावी .10 आगष्ट पासून सुरू होणाऱ्या विमान सेवेच नक्कीच स्वागत मात्र इतर ठिकाणच्या सेवा एअर इंडियाने पुरवाव्यात.केंद्र सरकार ने उड्डाण योजनेत बेळगावचा समावेश करावा अशी प्रतिक्रिया सिटीजन कौन्सिलचे सतीश तेंडुलकर यांनी दिली.