बेळगाव शहर आणि परीसरात चोरी तसेच घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे डीसीपी म्याडमनी पोलिसांची नुकतीच परेड घेतली आहे. मात्र तरी देखील चोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शनिवारी भाग्यनगर चौथा क्रॉस येथे गवत काढतो असे सांगून एका वृदेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविण्यात आली आहे.
पुढे दंगा सुरू आहे तुमच्या गळ्यातील दागिने काडून पिशवीत ठेवा, आम्ही पोलीस आहोत असे सांगून दागिने पाळविण्याचे प्रकार घडले आहेत. याचबरोबर वाहणावरून येऊन गळ्यातील चेन किंवा मंगळसूत्र हिसडा मारून घेऊन पलायन करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र गवत कापून घेऊन जातो असे सांगून चोरी करण्यात आल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.
भारत नगर चौथ्या क्रॉसवर शोभना नामक एक 70 वर्षीय वृद्धा थांबल्या होत्या. तेवढ्यात त्या मार्गावरून एक 25 ते 30 वर्षीय भामटा जात होता. वृदा थांबलेले पाहून त्याने आपल्या परिसरात चांगले गावात आहे, मी ते कापून स्वच्छ करतो, से त्या वृद्धेला सांगितले. ती वृद्धा येथे गावात वगैरे काही नाही, आई सांगत असतानाच त्या भामट्याने त्या वृद्धेचे तोंड दाबून गळ्यातील 20 ग्रामची चे लांबविली आहे.
ती वृद्धा आरडाओरडा करताच भामट्याने तेथून पोबारा केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. त्यामुळे यापुढेतरी पोलिसांनी अशा घटनांकडे लक्ष ध्यावे, व भांमतयाना जेर्बन करण्याची मागणी वाढू लागली आहे. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.