Thursday, December 19, 2024

/

कदंब बस वाहकासह ‘दारूची तस्करी करणारे दोघे अटकेत’

 belgaum

एकूण 40 लिटर आणि 200 मिली ची भारतीय बनावटीची विदेशी दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे.सी सी आय बी (City Crime Intelligence Bureau) पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई करत दोघांना गजाआड केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण चंद्रकांत म्हार्दोळकर वय 59 रा.न्यू गुडस शेड रोड बेळगाव आणि विश्वास शंबा तारी वय 57 रा.हलदोनी म्हापसा गोवा अशी सी सी बी आय पोलिसांनी अटक केलेल्या दारु तस्करांची नाव आहेत.

Leaker smagling

तारी हे गोवा राज्य परिवहन मंडळ कदंब बसचे वाहक आहेत तर अरुण म्हार्दोळकर हे सलून दुकान चालवतात. तारी हे बस वाहक असल्याने दररोज बेळगावला येत असायचे आणि येतेवेळी गोव्यातील दारू आणायचे आणि अरुण कडे सुपूर्द करायचे अशी माहिती मिळाली आहे.

पोलिसांना मुखबिरानी दिलेल्या टीप वरून सी सी बी आय पोलिसांनी शुक्रवारी साफळा रचून शुक्रवारी दारू तस्करी करते वेळी रंगे हात पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.