तुरमुरी या छोट्याश्या गावातून पुढे आलेली कुस्तीपटू एकलव्य पुरस्कार प्राप्त मलप्रभा जाधव हीची जकार्ता येथे होणाऱ्या १८ व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठीच्या २० दिवशीय प्रशिक्षण करीता तिला उझबेकिस्थान इथे जावे लागणार असून सामाजिक क्षेत्रातून आर्थिक मदतीची गरज आहे.
मलप्रभाचे वडील शेतकरी यल्लप्पा जाधव हे शेतकरी आहेत.गरीब कुटुंब असून या मुलीने मारलेली भरारी तिच्या गावालाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी भूषण ठरेल अशीच आहे. तिला या प्रशिक्षणास उपस्थिती लावली तरच स्पर्धेत सहभागी होता येणार असून आर्थिक मदतीची गरज समाजाने करावी लागणार आहे.
मलप्रभा हिने यापूर्वी झालेल्या इनडोअर एशियन गेम्स मध्ये सिल्वर मेडल घेऊन किरगिस्थान या परक्या देशात आपली छाप पाडली होती.
पुणे मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत ब्रॉन्झ पदक तिने मिळवले असून तब्बल
चारवेळा राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. यात दोन गोल्ड, एक सिव्हर, एक ब्रॉन्झ मेडल चा समावेश आहे. भारत सरकारने तिच्या या योगदानाची दखल घेऊन तिला एकलव्य पुरस्कार प्रदान केला आहे.
१९ वर्षीय मलप्रभा हिला
जितेंद्र सिंग या ज्यूडो प्रशिक्षकां चे मार्गदर्शन मिळत आहे.१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर अशी तिची स्पर्धा होईल तर त्यासाठी
उझबेकिस्थान मध्ये २ ते १९ ऑगस्ट पर्यंत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.त्यानंतर ती जकार्ता ला जाईल.
या कुस्तीपटूला आर्थिक मदत देऊन हातभार लावावा ही विनंती. तिला मदत करण्यासाठी……
संपर्क -जितेंदर सिंह ज्यूडो प्रशिक्षक(मलप्रभा जाधव) फोन:9480275501
खातेदाराचे नाव-मलप्रभा यल्लपा जाधव
बँकेचे नाव-कार्पोरेशन बँक नेहरु नगर बेळगाव
आय एफ सी कोड: CORP00002090
अकौंट नंबर:52010107605943