शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शनी मंदिरात गुरुवारी रात्री चोरी झाली असून चोरट्यानी देवाच्या गळ्यात घालण्यात आलेला वीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार चोरला.शटरच्या जाळीतून बारीक लोखंडी सळी घालून चोरट्यानी देवाच्या गळ्यातील हार लांबवला.
नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी पुजारी आनंद अध्यापक यांनी देवाची आरती करून देऊळ बंद केले आणि ते घरी गेले.सकाळी पूजा करण्यासाठी आनंद अध्यापक आले असता त्यांना मंदिरात लोखंडी सळी पडलेली दिसली.नंतर त्यांनी पूजा करण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्याचे शटर उघडले असता देवाच्या गळ्यात घालण्यात आलेला सोन्याचा हार चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लगेच त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून चोरीची माहिती दिली.खडेबाजार पोलिसांनी मंदिरात येऊन पंचनामा केला.खडेबाजार पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.चोरीला गेलेल्या हाराची किंमत पंचेचाळीस हजार रु.इतकी होते. चोरट्यांना चोरी साठी मंदिर देखील कमी पडताहेत त्यामुळे देवाची भीती देखील नाही अशी चर्चा सुरु आहे .