स्मार्ट बेळगाव शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करा यासाठी वेगवेगळ्या संघटना कडून आंदोलने होता असताना एका युवकाने खड्डे बुजवा यासाठी कॉंग्रेस रोड वर भर रस्त्यात बसून आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकांगी आंदोलन केल आहे.
मिशन सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव रेवण्णावर अस या एकांगी आंदोलन केलेल्या युवकाचे नाव आहे सकाळी सहा वाजल्या पासून त्याने कॉग्रेस रोड वर निदर्शन करून सर्वांच लक्ष वेधून घेतले होते. शहरात गेले पंधरा दिवसापासून होत असलेल्या पावसाने रस्त्यांची दैना उडाली असून कॉंग्रेस रोड, खानापूर रोड,भाजी मार्केट,कॅम्प,वडगाव,पिरनवाडी बस स्थानक सह आणि जुना पी बी रोड खड्डे मे बनला आहे.
महादेव रेवणकर याने एकट्याने हातात फलक घेऊन ठिय्या आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्वांच लक्ष वेधून घेतल होते.
रस्त्यांच्या दुर्दशेस ठेकेदार अधिकारीच जबाबदार
शहरात दोन वर्षात बनवलेल्या रस्त्यांच्या दुर्दशेस ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शहराच्या आमदार द्वयीनी केला आहे. बहुतांश रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्याची काळजी पालिका अधिकाऱ्यांनी घेतली नाही त्यामुळे दोघही यास जबाबदार आहेत असा आरोप आमदार अनिल बेनके आणि अभय पाटील यांनी केला आहे.
दोन्ही आमदार द्वायीनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केल आहे. निवडणुकी अगोदर शेवटच्या टप्प्यात झालेली कामे तर अगदी निकृष्ट दर्जाची आहेत अश्या ठेकदारांची काळी यादी बनवावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
रस्त्यांच्या दुर्दशे बदल आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून अधिकारी बदली आम्ही करणार नाही मात्र गरज भासल्यास निलंबन करू असा इशारा देखील त्या दोघांनी दिलाय.