खानापुरात आणि बेळगावात मराठी भाषक लोक आहेत त्यांना कन्नड सोबत मराठी कागदपत्र मिळावीत यासाठी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांना निवेदन दिल होत. जनतेला सोय होईल अशी व्यवस्था करा अशी मागणी या अगोदर केली आहे आता जनतेनी आमदार म्हणून निवडून दिलंय त्यामुळे मराठी परी पत्रकासाठी नक्कीच प्रयत्न करणार हा विषय मांडतच राहणार असे ठोस आश्वासन खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी दिलय.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीन मंगळवारी ‘पत्रकार’ या नियतकालीकाचे अनावरण केल्यावर त्या आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड कृष्णा मेणसे,मराठी पत्रकार परिषद मुंबईचे विश्वस्त किरण नाईक, बीड चे गजानन नाईक, पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, सचिव शेखर पाटील होते.
खानापूर बेळगावात मराठी पत्रकारितेचा अभाव जाणवतो आम्ही पण मराठीच आहोत.पत्रकारिता करणे ही मोठी जबाबदारी असली तरी आज जो एका पक्षाचा आहे म्हणून कमी लिहा त्यांना कमी दाखवा असे न करता त्याच काम पाहून पत्रकारिता करा भेदभाव करू नका असे आवाहन त्यांनी बेळगावातील पत्रकारांना केल.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक म्हणाले बेळगावातील पत्रकारांनी संघटीत होऊन कार्य केल्यास कर्नाटक सरकार जरी अडचणी आणत स्टील त्यावर देखील तुम्ही मात कराल अशी सूचना करत बेळगावात महाराष्ट्र शासनाकडून पत्रकार भवनासाठी निधी मिळवून देऊ मुख्यमंत्र्याकडे याचा पाठ पुरावा करू आणि बेळगावातील मराठी पत्रकारांना एक्रीडेशन मिळवण्या साठी मदत करू असे ठोस आश्वासन दिले.
अध्यक्षस्थावरून बोलताना कॉम्रेड कृष्णा मेणसे यांनी महाराष्ट्र आणि केंद्रात डोही कडे फडणवीस यंच सरकार असताना देखील बेळगाव सीमा प्रश्नांसाठी प्रयत्न होत नाहीत मात्र सुदैवाने महाराष्ट्र पत्रकार परिषद आणि पत्रकार हे बेळगावातील मराठी पत्रकारांच्या पाठीशी आहेत ही आनंदाची बाब असल्याच सांगितल.
तिलारीत धबधब्यात बुडणाऱ्या दोन मुलीना वाचवणाऱ्या ब्रेव बॉय मनोज धामणेकर आणि एस एस एल सी परीक्षेत ६२५ पैकी ६२५ गुण घेऊन राज्यात प्रथम आलेल्या ब्रेव्ह बॉय मोहंमद कीफ मुल्ला याचा सत्कार देखील करण्यात आला.सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी प्रास्तविक मध्ये संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला .सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले तर प्रा राजेंद्र पोवार यांनी आभार मानले.