शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या वरील बेळगाव बंदी उठवा अशी मागणी शिव प्रतिष्ठानने केली आहे.मंगळवारी सकाळी जिहाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वरील मागणी केली आहे.
भीमा कोरेगाव दंगलीचे कारण देऊन कर्नाटक सरकारने भिडे यांचा 21 जुलै रोजी होणाऱ्या संकेश्वर येथील कार्यक्रमात सहभाग होण्यास 31 जुलै पर्यंत बेळगाव जिल्हा बंदी घातली होती.
भिडे गुरुजींनी उभ्या आयुष्यात लाखो देशप्रेमी तरुण घडवले आहेत भीमा कोरेगाव दंगलीशी काहीही संबंध नसताना त्यांच्या वर खोटे आरोप ठेऊन बंदी घालून कोणाला खुश करण्या साठी सरकार खटाटोप करीत आहे?
ज्या महाराष्ट्रात भीमा कोरेगाव दंगल घडली त्या महाराष्ट्र सरकारने भिडे गुरुजींना क्लीन चिट दिली असताना कर्नाटक सरकार कोणत्या आधारे गुरुजींवर जिल्हा बंदी घालत आहे? असा देखील प्रश्न या निवेदनात विचारला आहे.
पुढील महिन्यात सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापना व खडा पहारा प्रचारासाठी भिडे गुरुजी बेळगाव दौऱ्या वर येत आहेत त्यांच्या सभेला परवानगी द्यावी ही विनंती. अश्या आशयाचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले या वेळी शिवप्रतिष्ठान चे जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, विभाग प्रमुख पुंडलिक चव्हाण,चंदू चौगुले, अभिजीत चव्हाण, गजानन पाटील,अंकुश केसरकर, सागर पवार, नरेश जाधव, नितीन कुलकर्णी, गजानन बडीवले, संगम ककेरी , चेतन माने, शुभम मोरे , अमोल केसरकर, गजानन निलजकर,अतुल केसरकर,प्रफुल शिरवळकर आदी उपस्थित होते.