शंकर गौडा पाटील यांनीच बेळगावात पक्ष संघटना बांधून मजबुती दिली आहे ते सर्वात जुन्या फळीतील भाजपचे कार्यकर्ते आहेत आमदार खासदार पद काय असतात ती त्यांनी बेळगावातल्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलेत त्यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावं असा आग्रह भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधीनी केलाआहे.
रविवारी भाजप राष्ट्रीय किसान मोर्चाचे उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील यांच्या वाढदिवसा निमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होते.आमदार महंतेश कवटगीमठ,आमदार अनिल बेनके,आमदार अभय पाटील, भाजपचे किरण जाधव प्रा विनोद गायकवाड आदींनी या भावना व्यक्त केल्या.
पाटील यांनी केवळ बेळगावच नव्हे तर उत्तर कर्नाटकात देखील भाजप बळकटी साठी कार्य केलं आहे.कै. आपासाहेब मुतगेकर,एम बी जिरली आणि कै परमानंद गोधवानी यांच्या कार्यकाळात पासून भाजप पक्ष वाढी साठी सक्रिय आहेत आज बेळगावात भाजप वाढलाय त्यात केवळ शंकर गौडा योगदान महत्वाच आहे असे म्हणत त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
शंकर गौडा पाटील समाज सेवा प्रतिष्ठान च्या वतीनं नव्याने बांधण्यात आलेल्याअनगोळ 32 नंबर शाळेच्या शाळा खोलयांचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शंकर गौडा पाटील यांचा नागरी सत्कार केला. खासदार प्रभाकर कोरे आणि सुरेश अंगडी, माजी आमदार विश्वनाथ पाटील यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
सामाजिक उपक्रमात सहभाग
शंकर गौडा पाटील समाजसेवा प्रतिष्ठान दहाव्या वार्षिक स्थापना दिवस आणि पाटील यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून सकाळी 8 वाजता चन्नममा गणपती मंदिरात विशेष आरती करून पूजा करण्यात आली त्या नंतर स्पंदन अनाथ मुलांना फळे वाटप तर महेश फौंडेशन या संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी वकिल एन आर लातूर, मल्लिकार्जुन सत्तीगेरी, नगरसेवक राकेश पलंगे,दत्ता मोरे,गजु नंदगडकर, संदीप खह्न्नूकर आदी उपस्थित होते.