तिलारी धबधब्यात बुडणा-या “त्या” दोघींचे प्राण वाचवणा-या कुद्रेमणीच्या मनोज धामणेकरचा चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे सोमवारी सत्कार करणार आहेत. आज “त्या” दोघींना वाचवणारा रियल हिरो म्हणून बेळगाव Live ने बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत तहसिलदार शिंदेनी हा निर्णय घेतला आहे.
गुरूवारी तिलारी मधील अडक्याचा वझर नावाच्या धबधब्या मध्ये तीन युवती बुडत असल्याचे पाहून स्वतः अपंग असतानाही पाण्यात उडी घेऊन दोघीना वाचवले. एकीला वाचवण्यात अपयश आले.
हळव्या मनाच्या मनोजला हा धक्का इतका बसला आहे की, त्याच्या डोळ्या समोरून ‘तो’ प्रसंग जायलाच तयार नाही.
आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचे जीव वाचवणा-या रियल हिरोचा चंदगडचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी उचित सत्कार करायचा ठरवला आहे. सोमवारी आपल्या कार्यालयात ते मनोजचा सत्कार करणार आहेत.
फोटो:चंदगड तहसिलदार
शिवाजी शिंदे हे अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत मोठ्या पदावर पोहोचलेली व्यक्ती आहेत. त्यामुळे सामान्य माणसांच्या दररोजच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देतात. अधिकारी असले तरी अधिकाराची हवा डोक्यात न जाऊ देता सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. तिलारी दूर्घटना त्यांना समजल्यानंतर या घटनास्थळी सहका-या समवेत त्यांनीही धाव घेतली होती. अशा या सहृदयी अधिकाऱ्याच्या हस्ते जिगरबाज मनोजचा सत्कार होणार आहे. त्याचा सत्कार करण्याची इच्छा बेळगाव Live कडे बोलून दाखवून जणू त्यांनी आपण एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता असल्याच त्यांनी दाखवून दिलय.
न्यूज अपडेट:अनिल तळगुळकर चंदगड