पालकांच्या खिशाला परवडणारी सेवा म्हणून विध्यार्थी वाहतूक रिक्षा हा पर्याय ठरला आहे. मात्र काही रिक्षा चालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची ने-आण करून त्यांच्या जीवशीच खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दुसून येत आहे. त्यामुळे असे रिक्षा चालक पोलिसांच्या रडारवर कधी येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मध्यंतरी पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत धडक कारवाईला सुरुवात केली होती आणि त्यामुळे अशा रिक्षा चालकांना आता चाप बसणार असे दिसून येत होते. मात्र पुन्हा याकडं पाठ फिरविण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी अशा रिक्षांना छोटे मोठे अपघात झाल्याचे दिसून येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांचे जीवन टांगणीला लावण्याच्या प्रकारला आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
एका रिक्षात नियमित प्रवाशापेक्षा दीडपट म्हणजे 10 छोट्या विद्यार्थ्यांना कोंबण्याचे प्रकार सर्रास पहावयास मिळतात. काही रिक्षा चालक तर 16 तर कधी 20 असे विद्यार्थी वाहतूक करतात. या छोट्या प्रवासातही रिक्षा चालक आणि पालकांचे नातेसंबंध जोडलेले असते. नियमानुसार विद्यार्थी घेतल्यास रिक्षाचालकाना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यामुळे तेही अधिक विद्यार्थी घेत असल्याचे सांगतात.
तसे पाहता 1 की. मी. अंतरासाठी एका विद्यार्थ्यांला महिन्याकाठी 400 ते 500 मोजावे लागतील. आणि तसेच शरतील रिक्षा चालक वर्षांतील केवळ 10 महिनेच पैसे घेतात. त्यामुळे अनेक पालकांना ते परवडणारे ठरते. तर माहीन्याकाठी काही मोजकीच रक्कम त्यांना द्यावी लागते अशा प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होत आहेत.
हे सारे खरे असले तरी निरागस मुलांचा काय दोष? हा प्रश्न राहतोच. काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? त्यामुळे एक अथवा दोन विद्यार्थ्यांची ने आण चालते. मात्र अधिक प्रमाणात विद्यार्थ्यांना कोंबून जीवाशी खेळण्याचे प्रकार थांबणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.