सावंगाव येथील गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सावंगाव ग्रामस्थांनी निदर्शन केली.
सावंगाव गावच्या गायरान जमिनीत निवासी शाळा बांधण्याच्या नावाखाली अतिक्रमण करण्याचा डाव चालवला असून सदर जमीन निवासी शाळेला देऊ नये या मागणीसाठी सावंगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हा पंचायत सदस्या माधुरी हेगडे,माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमा मोरे,तालुका पंचायत सदस्या नीरा काकतकर, ग्राम पंचायत सदस्य माधुरी पाटील,गोपाळ बसरिकट्टी महेश पाटील संतोष पाटील आर एम कांबळे यांच्यासह मृणाल हेब्बाळकर आदी उपस्थित होते.
अगोदरच या गावात शासकीय जमीन कमी उरलेत त्यांतच बेळगाव तालुक्यातील अनेक गावातील गायरान जमिनी शासकीय उपक्रम राबवुन अतिक्रमित केल्या जात असल्याचा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे.