कृष्णा नदीतून 2 लाख क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्याने होणाऱ्या संभावित पूर ग्रस्त गावांना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी भेट दिली.शुक्रवारी चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवरील येडुर मांजरी आणि कल्लोळी इंगळी गावांना भेट दिली.
मांजरी पुलातून 1 लाख 81 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाला आहे हिप्परगी बॅरेज मधून जमा झालेले 2 लाख 2 हजार क्यूसेक्स पाणी बाहेर सोडले असून आलमट्टी जलाशयातून 1 लाख 73 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.2 लाख 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग झाल्यास पूर परिस्थिती उदभवू शकते अशी माहिती जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी दिली.
महाराष्ट्राच्या कोयना जलाशयाची क्षमता 105 टी एम सी असून एवढं पाणी त्या जलाशयात साठवू शकतात आज पर्यंत 82.55 टी एम सी पाणी संग्रहित केलेलं आहे त्यामुळं कोयना जलाशय भरल्या शिवाय अतिरिक्त पाणी त्यांच्या कडून सोडले जाणार नाही असे असताना पूर स्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे असा दावा देखील जिया उल्ला यांनी केलाय.
सध्या महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाले असून दोन दिवसात नद्यांची पाणी पातळी खाली उतरू शकते नदी किनारी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून गंजी केंद्र देखील स्थापित करण्यात आलेत.,जिल्हा पंचायत सी इ ओ डॉ रामचंद्र राव,एस पी सुधींद्र कुमार रेड्डी,ए सी गीता कौलगी,डी एस पी दयानंद पवार उपस्थित होते.