Sunday, January 12, 2025

/

‘बेळगावातील युवतीचा तिलारीत बुडून मृत्यू’

 belgaum

बेळगाव खानापूर मधील काही मुले मुली तिलारी येथे फिरायला आली असताना तिलारी धरणानजिक असलेल्या धबधब्यात बुडून एका युवतीचा मृत्यू झाला आहे .सुप्रीता गाळी वय २० रा. इटगी ता. खानापूर जिल्हा बेळगाव अस बुडून मयत झालेल्या युवतीचे नाव आहे.

याबाबतची समजलेली हकिकत अशी की खानापूर मधील काही मुल मुली तिलारी मध्ये वर्षा पर्यटनासाठी आली होती. त्यांनी मुख्य तिलारी धरणाजवळील असलेला एक धबधबा शोधला. हा धबधबा विस ते पंचवीस फूट खोल असून बारमाही हा धबधबा कोसळतो.

या धबधब्या मध्ये यांच्या पैकी एक युवक पोहत आत गेला. मौज मस्ती करत करत बराच उशिर आत राहिल्यामुळे त्याचा दम पुरत नसल्यानं तो गटांगळ्या खात असल्याच एका मुलीला दिसल्यानंतर त्या मुलीनं त्याला वाचवण्यासाठी आपणही पाण्यात उडी घेतली. पण हिलाही व्यवस्थित पोहता येत नसल्यामुळे हिच गटांगळ्या खाऊ लागली. पण, दमलेल्या त्या युवकांने कसाबसा काठ गाठला. गटांगळ्या खाणा-या मुलीला वाचवण्यासाठी दुसऱ्या एका मुलीने पाण्यात उडी घेतली पण हि पण मुलगी गटांगळ्या खाऊ लागली. एवढ्यात इतर मुलींनी ओढणीने या मुलीला बाहेर काढले. पण, तोपर्यंत ती मुलगी पाण्यात पुढे ढकलली गेली होती.आणि तिथेच ती बुडून मेली अस प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. धबधब्यातील पाणी गढूळ असल्यामुळे आणि रात्र झाल्यामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी येत असून , मुलीच्या नातेवाईकांनी चंदगड पोलिस ठाण्याकडे धाव घेतली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या मुल मुलीही पोलिस ठाण्यात आहेत. ही मुलगी इटगी ता. खानापुरची असून सुप्रिता गाळी वय वर्षे २० अस नाव आहे.
सकाळी साडेसहा वाजल्या पासून मृतदेह शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. अस पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलय.

हळहळ आणि संतापही

दहा दिवसापूर्वी बेळगाव मधील पाच पर्यटकांचा तिलारी मध्येच अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे एकीकडे हळहळ तर दुसरीकडे पर्यटकांचा अतिउत्साह याला कारणीभूत ठरत असल्या बद्दल तीव्र संतापही व्यक्त होत आहे.

पोलिसही हतबल

मद्यधुंद पर्यटकांना रोखण्यात पोलिसही हतबल आहेत अस चित्र पहायला मिळत आहे. एकीकडे नाकाबंदी करून पर्यटकांची तपासणी करावी म्हटलं तर काही नागरिक पर्यटन कस वाढणार अशा आरोळ्या ठोकत असल्यामुळे पोलिस संभ्रमात सापडले आहेत.

न्यूज अपडेट – अनिल तळगुळकर, चंदगड

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.