बेळगाव शहरातील मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी मराठी संघटनांना संघर्ष करावा लागत असताना मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या खादरवाडी येथील कन्येने घवघवीत यश संपादन केलंय.
खादरवाडी येथील मंगल शरद पाटील हिने मैसूर विद्यापीठातुन एम एस सी बायोकेमिस्ट्री 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झाली आहे.
मंगल हिचे प्राथमिक शिक्षण खादरवाडी सरकारी मराठी शाळेत तर हायस्कुल खादरवाडी हायस्कुल मध्ये झाले होते नाव मोठे नसलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांत मातृभाषेतून शिक्षण घेऊन मंगल ने हे यश मिळवलं आहे.लहान पणा पासून ती गुणी विद्यार्थिनी आहे तिचा दहावीत देखील शाळेत प्रथम क्रमांक आला होता.
खादरवाडी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष (पोलीस पाटील )आणि ब्रह्मलिंग शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आर आर पाटील यांची नात असून तिच्या यशात नवं भारत सोसायटी मच्छे,महाराष्ट्र बँक टिळकवाडी यांचा देखील मोलाचे योगदान आहे.तिच्या या यशाने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.मराठी माध्यमात सरकारी शाळेत शिकून एवढी मजल मारल्या बद्दल तिचे बेळगाव live च्या वतीने अभिनंदन… पुढील वाटचालीस शुभेच्छा