शहर परिसरात दररोज 200 टन हुन अधिक कचरा निर्माण होतो. मात्र त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट होत नसल्याचे ओरड कायम असतेच. या कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करून त्यापासून वीज निर्मितीही हाऊ शकते. मात्र याचे गांभीर्य मनपा प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी आतातरी पुढाकार घेऊन कचऱ्याचे ढीग कमी करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत चालला आहे. तुरुमुरी येथे कचऱ्याचे डम्पिंग डाऊन आहे. परिसरातील अनेक गावांना त्याचा फटका बसू लागले आहे. अनेक आरोग्याच्या समस्य निर्माण होत आहेत. त्यामुळे येथील कचरा डेपो हलविण्याचा मागणी करण्यात येत आहे. जर यावर प्रक्रिया करून त्याची वीज निर्मिती करण्यात आली तर त्याचा फायदा मनपालाच होणार आहे.
मनपाने याबाबत ठराव करून मंजुरीसाठी बेंगलोर येथे पाठविणे गरजेचे आहे. मात्र याबाबत मनपाने उदासींनता दाखविण्यातच धन्यता मानली आहे. जर हा प्रकल्प उभे केल्याच बऱ्याच प्रमाणात वीज समशाही मिटणार आहे. याबाबत नागरसेवकांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. मात्र असे प्रकल्प राबविण्याचे सोडून नको त्या गोष्टीत रस असल्याचे दिसून येत आहे.
बेळगावात 200 टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्यामधून दररोज 200 हुन अधिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून 220 हुन अधिक किलो व्हॅट वीज निर्मिती होऊ शकते. मात्र तासाठी मनपाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर हा प्रकल्प यशस्वीपणे राबविल्यास शहरातील कचरा आणि विजची समस्या काही प्रमाणात मार्गी लागणार आहे