मुख्यमंत्र्यावर कॉंग्रेसचा कोणतेही दबाव तंत्र नाही असे स्पष्टीकरण अवजड उद्योग आणि साखर मंत्री के जे जॉर्ज यांनी दिलंय. मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी अश्रू काढले होते त्या बाबत त्यांना विचारले असता बेळगावात पत्रकार परिषदेवेळी ते त बोलत होते. स्वता मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी आपणावर कॉंग्रेसचा कोणतही दबाव नाही असे म्हटलं आहे जनतेच्या समस्या बाबत कुमार स्वामी यांना डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते त्यांची मनस्थिती मजबूत आहे अशी पुष्टी जॉर्ज यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच पद हे मजा करण्याच पद नसून त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे प्रत्येक मुख्यमंत्र्याला सरकार चालवण्यासाठी जबाबदारी त्रास होतोच काही जण दु:ख आतल्या आत दाखवतात तर काही जन बाहेर अश्रू काढून व्यक्त करतात त्यांनी जनतेच दुख अश्रूंच्या माध्यमातून बाहेर काढले आहे . लोकांची दुख आत घेऊन गप्प बसण्यापेक्षा त्यांनी बाहेर काढली आहेत असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेवेळी आमदार लक्ष्मी हेबबाळकर,जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी आदि उपस्थित होते.