रहदारी आणि पोलिसांनी मद्य पिणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आणि त्यावर आता निर्बंध आणण्यासाठी कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे जर मद्य पिणारे सापडले तर त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे मद्य ढोसताय जर जपूनच म्हणण्याची वेळ आली आहे.
मद्य पिल्यानंतर जर दोन वेळा त्याच्यावर कारवाई झाली आणि परत तिसऱ्यांदा ही ती व्यक्ती कारवाईच्या सापट्यात अडकली तर त्याचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे मद्य पितांना विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर यापुढे मद्य ढोसून धिंगाणा घालण्यात आले तर परवाना आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे यापुढे काळजी घ्यावी लागणार आहे.
बेळगाव पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी मद्य पिणाऱ्यावर कारवाईचा बडगा यगरला होता. यावेळी २०१ जणांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे १०० रुपयापासून ते ३००० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीची केलेली नशा आता महागात पडणार आहे.
पोलिसांनी ही कारवाई एकच दिवस केल्याने यात सातत्य राहणार की नाही असा प्रश्न अधोरेखित होतो. जर पोलिसांनी ही कारवाई सातत्याने राबविली तर मात्र मद्यपिंची पंचायत होणार आहे. यापुढे जर मद्य प्यायचे असेल तर वाहन चालवायला बंदी आणावी नाहीतर परवाना गमवावा लागला आहे. त्यामुळे आता मद्य पिल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.