छत्तीसगढ येथे नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या खानापूरच्या जवानाच्या कुटुंबियांस आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी मदतीचा हात दिला आहे.
सोमवारी सकाळी खानापूर तालुक्यातील हलगा येथील हुतात्मा जवानाच्या परिवारास भेट देऊन सांत्वन केले आणि स्वता कडचे एक लाख रुपयांचा धनादेश आर्थिक मदत म्हणून दिला. गेल्या सोमवारी छत्तीसगढ येथे कारवार येथील जवान आणि संतोष गुरव यांना वीरमरण प्राप्त झाले होते कर्नाटक सरकार कडून देखील मयत जवानाच्या परिवारास मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी निंबाळकर यांनी दिले