ग्रामीण मतदार संघातील जनतेने मला घरच्या मुलीप्रमाणे वागणूक दिली आहे त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिलं आहे.
रविवारी धर्मनाथ भवन येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.गत निवडणुकीत राबलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
काही लोकांनी आता पासूनच लक्ष्मी हेब्बाळकर याच लोकसभेच्या प्रबळ दावेदार अशी चर्चा चालू केली आहे मात्र जनतेने इतक्या भरघोस मतांनी निवडून दिलंय त्यामुळं हा मतदार संघ सोडण्याचा प्रश्नच उदभवत नाही .लोकसभा निवडणुकीत आता स्वारस्य नाही त्यामुळे लढणार नाही.लोकांनी इतक्या विश्वासानं मला विधानसभेत पाठवलं आहे जास्तीतजास्त मतांनी मला निवडून दिले आहे अति आशा बरी नव्हे मी कार्यकर्त्यांचे आभार मानते असं देखील त्या म्हणाल्या.
मत याचना करताना जे शब्द दिलेत ते पूर्ण करून या भागाचा कायापालट करू कुमारस्वामी यांनी ग्रामीण मतदार संघ म्हणजे आपला मतदार संघ अशी भावना बोलवून दाखविली आहे त्यामुळे पाच वर्षात या मतदारसंघाचा कायापालट करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी काँग्रेस नेते युवराज कदम,अडीवेश इटगी,सी सी पाटील यल्लपा ढेकळकर आदी उपस्थित होते.
माजी आमदारांनी माझ्यावर ग्राम पंचायत सदस्य म्हणून सुध्दा निवडून येऊ शकत नाही अशी बोचरी टीका केली होती मात्र प्रत्येकाचं नशीब प्रत्येकाकडे असतंय गेल्या दहा वर्षात मतदार संघात काय झालंय ते जनतेने पाहिलंय असेही त्या म्हणाल्या.