मागील सरकारच्या सिद्धरामय्यानी जो बजेट मांडला होता तोच बजेट संमिश्र सरकार मध्ये एच डी कुमार स्वामी यांनी पुढे वाचला आहे त्यामुळे या बजेट मध्ये उत्तर कर्नाटकावर अन्याय झालाय असे मुळीच मानणार नाही असे असे मत माजी पंत प्रधान आणि जे डी एस चे राष्ट्रीय अध्यक्ष एच डी देवेगौडा यांनी व्यक्त केलय.
रविवारी सायंकाळी बेळगाव येथे शासकीय विश्राम धामात आयोजित पत्रकार परिषदेवेळी व्यक्त केले. या बजेटमध्ये एकूण ४४ हजार कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे याचा लाभ उत्तर कर्नाटका सहित राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकी बद्दल कॉंग्रेसशी जागा वाटप बद्दल बोलणी सुरु आहे जे डी एस ला दहा सीट द्याव्या लागतील असे वीरप्पा मोईली म्हणाले होते मात्र ते त्याचं वयक्तिक वक्तव्य आहे त्यामुळे जागा वाटपा बद्दल अंतिम बोलणी कॉंग्रेस बरोबर व्हायची आहे असेही ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कॉंग्रेस बरोबर जे डी एस ची युती व्हायची शक्यता खूप आहे कारण स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेस आणि जे डी एस ची विचार धारा वेगवेगळी असते. मागील विधानसभा निवडणुकीत जे डी एस पक्षातील नेत्यांनी चुकीचे निर्णय घेतले आहेत ज्या जिल्ह्यात पक्षाला फटका बसलाय त्या जिल्हा समित्या बरखास्त केल्या जातील आणि नवीन पक्ष बांधणी केली जाईल बेळगाव जिल्हापक्ष संघटना देखील बरखास्त करून नवीन कार्यकारणी निवडली जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
कोकणी भागातील लोकांनी कुमार स्वामी आपले मुख्यमंत्री नव्हेत म्हणून फलक दाखवल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील मात्र कुमार स्वामी कोणत्याही प्रदेशावर अन्याय करणार नाहीत असा ठाम विश्वास व्यक्त करत ते महिला युवक दिन दुबळ्या गरीब अपंग शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री आहेत असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला