कंग्राळी खुर्द येते मोठमोठे खडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ओरवास करावा लागत आहे. त्यामुळे याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीनि याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामळे येथील ग्रामस्थानी रस्त्यातच झाडे लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.
कंग्राळी खुर्द येतील गावात शिरतानांच पाहुण्यांचे खड्डयांनी स्वागत करावे लागत आहे. माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व विद्यमान पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्या बस स्थानक आवारात रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालविताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरम्यान छोटे मोठे अपघात ही होत आहेत. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करून मजबूत करावा आहे मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.
सतीश जारकीहोळी यांनी 3 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर रमेश जारकीहोळी यांनी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. असे सांगितले होते. पण प्रत्येक्षात काहीच झालेले आंही, असे दिसून येत आहे.
तसे पाहता मार्कंडेय यार्ड पासून कंग्राळी नदीपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे. मात्र या रस्त्याचे कंत्राटदार डागडुजी करण्यातच व्यस्त असल्याचे दिसुम येत आहे. त्यामुळे हा रस्ता डांबरीकरण करून नागरिकांची सोय करावी, अशी।मागणी करण्यात आली आहे. जर लवकरच या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत तर येत्या बुधवारी रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हा रस्ता करण्यासाठीचे सदर निवेदन ग्राम पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, तालुका पंचायत च्या सदस्य मनीषा पालेकर, आर. आय. पाटील, चेतक कांबळे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.