तालुका पंचायतीचा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झाली आहे. गेल्या वर्षी तालुका पंचायत कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी सुमारे २१ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता, मात्र हा निधी वाया गेल्याचेच दिसून येत आहे. इतकी रक्कम खर्च करून देखील कार्यालयाची गळती काही थांबली नाही. यामुळे संशय निर्माण होत आहे.
तालुका पंचायतीचे काम करायचे आहे असे सांगून बराच निधी लपेटण्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे. यामध्ये अधिकारीही शामिल असून अध्यक्षांनी प्रमुख भूमिका निभावल्याची माहिती मिळाली आहे. काहींनी याबाबत आर टी आय कडे तक्रार करण्याची तयारीही सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण अनेकांना शेकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील वेळी तालुका पंचायतीचे काम करण्याचे सांगून प्रत्येक सदस्याच्या फंडातून २० तर २५ हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे सदस्यांनी सभागृहात चांगलाच गोंधळ माजविला होता. मात्र याकडे दुर्लक्ष करून अध्यक्षांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे.
समान्तर फ़ंड उतरणाबाबत आता लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे. मात्र ही बैठक अध्यक्ष व अधिकाऱ्यांना त्रासाची ठरणार अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे यावेळी जर समन्तर फंड वितरित करण्यात आला नाही तर अध्यक्षांची खुर्ची अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.