Thursday, January 23, 2025

/

‘शिमलाच्या नगरसेवकांनी केला बेळगावातील पाणी पुरवठा योजनेचा अभ्यास’

 belgaum

स्मार्ट सिटीत बेळगाव शहराचा समावेश केल्या नंतर बेळगाव शहर देशाच्या पटलावर झळकू लागले आहे. शहराच्या दहा वार्डात पुरवठा केली जाणारी चोवीस तास पुरवठा योजेनेने हिमाचल प्रदेश च्या शिमला महा पालिकेच्या नगरसेवकांना भुरळ घातली आहे त्यामुळे  स्वच्छतेत पिछाडीवर गेलेल्या बेळगाव पालिकेसाठी ही एक दिलासा देणारी गोष्ट ठरली आहे.चोवीस तास पाणी पुरवठा योजेनेचा अभ्यास करण्यासाठी शिमला महानगर पालिकेच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट दिली आणि अभ्यास करून माहिती जाणून घेतली. शिमला पालिकेचे उपमहापौर राकेश शर्मा यांच्या नेतृत्वात १४ नगरसेवक,आणि अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बेळगावला भेट देऊ अभ्यास केला.पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थे बद्दल आणि चोवीस तास पाणी पुरवठा योजने बद्दल एक खास प्रेजेन्टेशन देऊन सविस्तर माहिती दिली.

simla corporators belgaum
बेळगाव हे एक सुंदर शहर असून इथले थंड आणि हिरवळ पाहून मन प्रसन्न झाले आमचे घर सोडून आम्ही प्रवासात असलो तरी इथले वातावरण पाहून आम्हाला आमच्या घरातच आहोत अस वाटत आहे खास करून इथल्या हिरवळने आम्हाला भुरळ घातली आहे असे मत पाणी पुरवठा माहिती घेतल्यावर शिमलाचे उपमहापौर राकेश शर्मा यांनी भावना व्यक्त केली.
पाण्याच्या गळती नसताना एका ठिकाणावरून पाणी पुरवठा व्यवस्था करणे आम्हाला आवडली आहे याच धर्तीवर शिमला पालिकेत देखील २४ तास पाणी पुरवठा यंत्रणा राबवणार आहोत असे म्हणत शर्मा यांनी बेळगाव पालिकेच्या चोवीस तास पाणी पुरवठा योजेनेची प्रशंसा व्यक्त केली.यावेळी हिमाचलच्या शिष्टमंडळांने शिमलाचे पारंपारिक ड्रेस कोड असलेली टोपी भेट दिली महापौर बसप्पा चिखलदिनी, उपमहापौर मधुश्री पुजारी,आयुक्त शशिधर कुरेर, नगरसेवक दीपक जमखंडी यांना टोपी परिधान केली.यावेळी नगरसेवक दिनेश नाशिपुडी,सरला हेरेकर, रेणू मुतगेकर सरिता पाटील, लक्ष्मी निप्पाणीकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.