गेले तीन दिवस होत असलेल्या संततधार पावसामुळे बेळगावं वेंगुर्ला रोड वर विनायक नगर येथे जुनाट झाड कोसळून दुचाकी चक्काचूर झाली मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पावसात मागील 15 दिवसांपूर्वी अरगन तलाव जवळ झाड कोसळून दुचाकी चक्काचूर झाली होती त्यावेळी दोघे जण किरकोळ जखमी झाले होते त्यानंतर याच रोडवर झाडं कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.
झाड़ दुपारी दोन वाजता कोसळल्याने वन खात्याला याची कल्पना देण्यात आली मात्र एक तास वन खाते तिथं न पोचल्याने ट्रॅफिक जॅम झाला होता.हिंडलगा आणि विनायक मंदिर पर्यंत दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांका लागल्या होत्या मात्र पाईप लाईन पासून हिंडलगा अशी ट्रॅफिक वळवण्यात आली होती. कोसळलेलं झाड; काढल्यावर सायंकाळी चार नंतर मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. पावसाळ्यात वन खात्यानेही सतर्क राहायला पाहिजे आपत्काल स्थितीत मदत पोचवण्यात वन खात्याने उशीर केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली .