हुक्केरी तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी नदी म्हणून हिरण्यकेशिकडे पाहिले जाते. मात्र या नदीचे पात्र कमी होत असल्याने याच्या पुनरचेतनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आता हुक्केरी तालुका पंचायतिच्या माध्यमातून विकास करण्याचे ठरविण्यात आले आले आहे. मात्र पावसाळा सुरुवात झाला आणि कामाला स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
उधोग खात्रीतून सध्या या नदीच्या विकासाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे या नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल अशी अशा व्यक्त होत आहे. त्यामुळे यासाठी आता जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जर ही नदी उधोग खात्री योजनेतून खोदाई करण्यात आली तर याचा फायदा या परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांना होणार आहे. त्यामुळे या नदीचे पाणी वाया होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
मागील महिन्याभरापासून या नदी पात्रात खोदाई करण्यात येत आहे. आत्तापर्यंत या कामासाठी उधोग खात्री योजनेतून १२०० रोजगारांना काम देण्यात आले आहे. त्याचबरोबर या नदी काठी असलेल्या कामगारांकडून हे काम करून घेण्यात येत आहे.
या नदीचे काम पाऊस सुरू झाल्यामुळे थांबविण्यात आले आहे. नदीमध्ये पाण्याचा प्रवाह अधिक प्रमाणात वाढल्याने या कामाला पावसानंतर सुरुवात करण्यात येणार आहे. आतापर्यत सुमारे १ की. मी. खोदाई करण्यात आली आहे. मार्कंडेय नदीच्या धर्तीवर या नदीचा कायापालट करण्याचा उद्देश जिल्हा पंचायतच्या माध्यमातून करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी पावसाळ्यानंतर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. १२०० रोजगारांना आतापर्यन्त रोजगार देण्यात आला असून त्याकडे लक्ष देण्यात येणार आहे.
नदीला नवसंजीवनी देण्याचे काम प्रामाणिकपणे होण्याची गरज आहे.