केंद्र सरकारने प्रत्येक रेल्वे स्थानकावर आता सिसिटीव्ही बसंविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकावर चोरी करणाऱ्यांची छबी कैद होणार असून गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी हे पाऊल यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकावर चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.
ही बाब रेल्वे पोलिसांना डोकेदुखीची ठरू लागली आहे. यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय बेळगाव पोलिसांना फायदेशीर ठरेल असे वाटते. मात्र यासाठी पोलिसाची थोडी धावपळ होणार आहे. जर प्रत्येक रेल्वेत सिसिटीव्ही बसविल्यास चोरीच्या घटनांवर चाप बसणार आहे.
संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम होण्यासाठी भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. यासाठी २५०० कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात येणार असून या वर्षी पहिल्या टप्प्यात ४३६ स्थानकांवर सीसीटीव्ही, तर दुसऱ्या टप्प्यात ५४७ स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. यामध्ये बेळगाव रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे
महिल्यांची छेडछाड तसेच स्थानकावरील अनेक गैरप्रकार रोखण्यासाठी आता मदत होणार आहे. या कामांना लवकरच सुरू करण्यात येणार आहे