महा माहीम राष्ट्रपतींच्या गार्डनची देखभाल करण्याकरिता पैश्यांची नासाडी झाल्याचा आरोप करत जिल्याचे निधर्मी जनता दलाचे नेते आर टी आय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी गेल्या तीन वर्षात १२ कोटी रुपये उद्यानाची देखभाली साठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती दिली. माहिती अधिकार कायद्या खाली त्यांनी एवढी रक्कम खर्च झाल्याची माहिती मिळवली आहे.
दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाच्या उद्यानाच्या देखभालीचा खर्च त्यांनी आर टी आय मधून मिळवला आहे. उद्यानातील फ्लॉवर मॅनेजमेंटसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेसाठी 1.46 कोटी रुपये खर्च केले जातात माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीत तीन वर्षात जरी १२ कोटी खर्च केले जातात त्यात कर्मचाऱ्यांचा पगार सामील केला नव्हता असे देखील ते म्हणाले.
फेब्रुवारी २०१८ च्या पहिल्या महिन्यात कामगारांच्या पगारासाठी ७२ लाखांचा खर्च टाकण्यात आला आहे तर वार्षिक रित्या 2015-16 मध्ये 3.73 कोटी खर्च, 2016-17 मध्ये 4.56 कोटी खर्च, 2017-18 मध्ये 4.40 कोटीचा खर्च झाला असल्याचे देखील ते म्हणाले. राष्ट्रपती भवनातील पार्कमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेल्या पैशांच्या रकमेबद्दल आपण राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय असेही ते म्हणाले.