Friday, December 20, 2024

/

‘शेतकऱ्यांचा व्याप..रहदारीला ताप’

 belgaum

पूर्ण कर्ज माफी करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी सोमवारी शहरातील कित्तूर चन्नमा चौकात शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन करून तब्बल चार तास रास्ता रोको केला कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरू सेनचे शेकडो शेतकरी बांधवानी हा रस्ता रोको केला होता.
सोमवारी सकाळी चन्नमा चौकात मानव साखळी करून आंदोलन केल मग जिल्हाधिकाऱ्याना निवेदन सादर केल. कुमार स्वामी मुख्यमंत्री होताच चोवीस तासात कर्ज माफी करू अशी घोषणा करण्यात आली होती स्वामी सत्तेवर येताच जे डी एस ने आपले दात दाखवले आहे असा आरोप करत स्त्री शक्ती सहाय्य धर्मस्थळ संघ,महिलांची कर्जे माफ तसेच कळसा भांडुरा प्रकल्प जारी करा अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले लवकरात लवकर देण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदना द्वारे देण्यात आलाय. यावेळी चुनाप्पा पुजारी,लिंगराज पाटील,अशोक यमकनमर्डी,रवी सिद्दन्नावर यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

rasta roko

रहदारीला अडथळे
कित्तूर चन्नमा चौकात शेतकऱ्यांनी मानव साखळी करून रस्ता रोको आंदोलनामुळे दुपारी शहरातील रहदारी पूर्ण पणे कोलमडली होती. दुपारी बारा वाजता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिल्यावर चन्नम्मा चौकात रास्ता रोकोस सुरुवात केली तब्बल तीन तासाहून अधिक काळ हा चौक रास्ता रोको करून अडविल्याने वाहन धारकांना आणि सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला होता. शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरु होताच  एक एम्बुलंस देखील सोडली नाही एवढे शेतकरी आक्रमक झाले होते वाहन चालकातून अनेकांनी जाब विचारला, सामान्य जनतेला वेठीस धरू नका प्रशासनाशी भांडा अशी भूमिका अनेक वाहन चालकांनी मांडली मात्र तरी देखील शेतकरी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते संतप्त शेतकऱ्यांनी अनेकांशी वाद घातल्याचे प्रसंग देखील घडले या सगळ्या प्रकारात पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

farmers rasta roko

(photo : शेतकऱ्यां सोबत वाहनचालकांचे  रहदारी अडथळ्या मुळे उडालेले खटके)

खासदारांना आंदोलनात बसवले

संवेदनशील असणारा बळीराजा सोमवारी बेळगावात भलताच आक्रमक झाला होता आंदोलन काळी शेतकऱ्यांनी भाजप जनता दल आणो कॉंग्रेसच्या तिन्ही पक्षांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही शेतकऱ्यांनी खासदार सुरेश अंगडी यांच्या कार्यालया समोर जाऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली अन खासदारांनाही आंदोलन स्थळी आणले अन सहभाग घ्यायला भाग पाडला.दुपारी साडे तीन च्या दरम्यान पोलीस आयुक्त डी सी राजप्पा ,जिल्हाधिकारी एस जिया उल्ला आणि खासदार सुरेश अंगडी यांच्या उपस्थितीत शेतकरी नेत्यांनी प्रशासनास १५ दिवसांचा अवधी दिला अन आंदोलन मागे घेतले. सोमवारी दुपारी बेळगावकरांनी उत्तर बेळगावात अभूतपूर्व ट्राफिक जाम अनुभवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.