अवघ्या १५ दिवसांपूर्वी बेळगाव जवळ मच्छे नजीक झालेल्या अपघातात बेळगावच्या तीन कोवळ्या युवकांचा मृत्यू झाला होता. ती ही घटना रविवारी घडली होती. आज सुद्धा रविवारीच बेळगावच्या पाच पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूणच पावसाळी प्रयत्न महागात पडत असून सावध होण्याची हीच वेळ आहे.
यल्लाप्पा पाटील(४५)रा.बोकनुर, पंकज किल्लेकर(३०) रा.शिवाजी नगर,मोहन रेडेकर (४०) रा. बाळेकुंद्री,नागेंद्र गावडे(२९) रा. अष्टे आणि किशन गावडे(१९) रा.जुने बेळगाव या पाचही जणांचा तिलारी घाटात कार खाईत कोसळल्याने दुर्दैवी अंत झालाय. किशन गावडे हा नातलगा सोबत गेलेला उरलेले सर्वजन भक्ती महिला या पथ संस्थेशी निगडीत होते कुणी पिग्मी कलेक्टर होता तर कुणी क्लार्क तर कुणी अकाउंटनट होता. सगळे जण रविवार सुट्टी म्हणून तिलारीत पर्यटन करायला गेले होते मात्र लष्कर पॉइंट जवळ त्यांच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने किंवा टायर बष्ट झाल्याने गाडी ५० फुट खोल दरीत कोसळली अन यातच त्यांचा अंत झाला.
फिरण्याच्या होऊ मौजेपायी असा जीव घालवणे किती योग्य आहे? फिरायला जाण्यात काहीच चुकीचे नाही मात्र त्या पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यावर आपण कसे सुरक्षित राहू याचे भान बाळगायला पाहिजे नाहीतर अशा दुःखद घटनांना सामोरे जावे लागणार आहे.
पावसाळा आला की सगळ्यांनाच बाहेरच्या पर्यटन स्थळांवर फिरायला जाण्याची हौस वाटते. आंबोली, तिलारी आणि इतर ठिकाणी लोक मोठ्या संख्येने जमतात. नाचतात, दंगा घालतात आणि अतिशय अडचणीची ठिकाणे बघून तेथे जाण्याचा शूर वीर पणा करायला जातात. तरुण युवा मुले तर पर्यटनाच्या ठिकाणी गेल्यावर शुद्धीत राहायचेच नाही असे ठरवून वागतात.
थंड हवेत जायचे आणि तिथे गेल्यावर थंड हवेत दारू प्यायची अशी पद्धत सुरू झाली आहे. या पद्धतीमुळे मग स्वतःवर ताबा राहत नाही आणि हातातून नको ते घडून अपघात आणि दुर्घटना होतात.
अपघात झाला की सहानभूती दाखवायला हवी पण झालेल्या चुकांची चर्चा झाली तर पुढचे चुकणार नाहीत. आज जे गेले ते सर्वसामान्य वर्गातील होते. त्यांच्या नोकरीवर त्यांची कुटूंबीय अवलंबून होते. आता गेलेले परत येणार नाहीत पण बाकीच्यांनी लक्षात घेऊन सावध व्हायाची सुधारण्याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.
पर्यटन स्थळांना जा पण काळजी घ्या
१. पहिल्यांदा सावधपणे वाहने चालवा
२. जिथे अडचण आहे किंवा वाहन चालवणे कठीण आहे तिथे चालत जा
३. वाहन घेऊन जायचेच असेल तर पूर्णपणे शुद्धीवर राहणार चालक घेऊन जा
४. तुम्ही दारू सारख्या व्यसनांना दूर ठेवा. किमान मर्यादेत व्यसने करा.
५. आपण जात असताना घराचे लोक आपली वाट बघत आहेत हे सतत लक्ष्यात ठेवा.
अपघात होऊ नव्हेत म्हणून ही काळजी घ्यावीच लागेल.