स्मार्ट बेळगावच्या वैभवात भर टाकणाऱ्या अरगन तलावाचे सौन्दर्यीकरण करणाऱ्या मराठा सेन्टरच्या अधिकाऱ्यानी तलावा भोवती वृक्षारोपण केल आहे.शनिवारी सकाळी मराठा रेजिमेंटच्या जवानांनी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली. पाच तलावांच्या सभोवती जवानांनी एक हजारहून अधिकफळ फळांची रोपे लावली.
पाच तलावांच्या आजूबाजूला हिरवळ वाढवण्याच्या उद्देशाने रोपटी लावण्यात आली आहेत यामुलेया परिसरात प्रवासी पक्षी देखील आपली घरटी घालायला पाहुणे म्हणून दाखल होतील त्यांना तलावांच आकर्षण असणार आहे. गेल्या आठ महिन्या पासून तलावांच खुदाई करून गाळ काढल्या नंतर तलावांच पुनरुजीवन झाले असून या गेल्या दोन दिवसात झालेल्या मान्सूनच्या पावसाने तलाव तुडुंब भरले आहे
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राचे ब्रेगेडीयर गोविंद कलवाड निवृत्त ब्रेगेडीयर मोहन पत्तार यांच्यासह मराठा रेजिमेंट जवान अधिकाऱ्यासह कुटुंबियातील सदस्यांनी देखील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला होता बेळगाव विभागाचे मुख्य वन संरक्षक अधिकारी कृष्णा उद्पुडी यांनी वन खात्याच्या वतीने लिंबू,पेरू,चिंच, वड,आदी रोपे देण्यात आली होती.यावर्षी भरपूर पाऊस झाल्यास अरगन तलावांच्या वातावरणात रोपटे चांगली येतील आली तलावाच्या सौन्दर्यीकरणात वाढ करतील हीच अपेक्षा आहे.