बेळगाव शहराची निवड स्मार्ट सिटी च्या यादीत होऊन चार वर्षे उलटली तरी अत्यंत धीम्या गतीने कामे सुरु आहेत असा आरोप होत असतानाच या योजनेचे एम डी पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी शुक्रवारी बैठक घेतली आहे.
स्मार्ट सिटी योजनेत शहरातील काही नामवंत सल्लागारांचे सल्ले घेण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन मुद्नुर,शिवाप्पा कुंदरगी,डॉ सोनाली सरनोबत आणि अरविंद संगोळी यांनी चर्चेत सहभागी होऊन स्मार्ट प्रोजेक्ट बद्दल सल्ले दिले.
आगामी काही दिवसात पूर्ण होणाऱ्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कला मंदिर येथील संकुल च्या आराखड्या बद्दल चर्चा झाली वेळेअभावी हे काम अपूर्ण असल्याची माहिती देऊन लवकरच या कामास गती मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली. महात्मा फुले उद्यानात प्रस्तावित आर्ट गलरी च्या डिजाइन बद्दलमाहिती देण्यात आली. रामतीर्थ नगर येथील खुल्या जागेत म्युजियम,अडव्हेंचर पार्क,सायन्स पार्क स्केटिंग रिंग,रनिंग वाकिंग पाथ आणि प्रदर्शन विभाग सारखे मनोरंजनाचे विभाग बनवण्याच्या प्रोजेक्ट बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.पालिका आयुक्त कुरेर यांनी सर्व सल्लागार मंडळी कडून प्रत्येकाचे विचार ऐकून घेतले.
निवडणुकी मुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे बरीच कामे रेंगाळली होती मात्र आता अधिकारी रुजु झाले आहेत त्यामुळे लवकरच या कामांना देखील गती येईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. पुन्हा एकदा स्मार्ट बेळगावचा श्री गणेशा झाला आहे लवकर ही कामेपूर्ण होवोत हीच सदिच्छा…