Thursday, January 23, 2025

/

सावधान कुत्र्यांचा वावर वाढतोय…

 belgaum

शहराबरोबर ग्रामीण भागातील कुत्र्यांचा वाढता वावर चिंताजनक बनत आहेत. त्यामुळे ही बाब गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. थातुरमातुर कुत्री पकडण्याचे मोहीम राबवून नागरिकांची दिशाभूल करण्यावरच प्रशासन धन्यता मानत आहे.

bhataki kutri
मागील महिन्यात चार बालकांसह तीन महिला आणि आणखी काही जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. या हल्ल्यात एका 40 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात या कुत्र्यांचा वाढता उपद्रव डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीने ही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.पालिका कार्यक्षेत्रात वडगांव भागात कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
भटक्यां कुत्र्यांचा प्रश्न उग्ररुप धारण होऊ लागला आहे. एकाचा मृत्यू झाला तरी याबाबत निर्बिजीकरण करणे आवश्यक आहे. काही प्रमाणात शहरात कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली होती मात्र ही मोहीम राबविण्यात मनपाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.
दिवसेंदिवस वाढणारी ही संख्या गांभीर्याने घेण्याची गरज आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले खाद्य पदार्थ, मटण व मच्छी मार्केट मधील कचऱ्यामुळे अशा ठिकाणी कुत्र्यांचा वावर असतो. मटण व इतर मांसाहारी पदार्था मुळे मुळे कुत्री पिसाळलेला निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा विचार करण्याची गरज आहे.

महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

आपल्या शेतीची पाहणी करण्यास गेलेल्या एका हुकेकरी तालुक्यातील भैरापूर येथील महिला डॉक्टरांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली असून त्या डॉक्टरावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत यशोदा धुंडाप्पा देसाई असे त्या महिला डॉक्टराचे नाव असून तिच्या वर अति दक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
आपल्या शेताची पाहणी करायला गेलाय असता सात कुत्र्यांनी त्यांच्या जीव घेणं हल्ला केला आहे अनेक ठिकाणी चावा घेऊन इजा पोचवली आहे हुक्केरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.