ग्रामीण मतदार संघातील सरकारी शाळांच्या विकासासाठी विशेष निधी द्यावा अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
गुरुवारी बंगळुरू मुक्कामी प्राथमिक शिक्षण मंत्री महेश यांची भेट घेऊन सदर मागणी केली आहे.ग्रामीण मतदार संघातल्या शाळांच्या विकासाची 9 कोटींची योजना आणि आराखडा मंत्र्यांकडे सुपूर्द केला.तालुक्यातील सरकारी शाळांची अवस्था दयनीय असून विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा देण्याची गरज हेब्बाळकर यांनी व्यक्त केली आहे.
सध्याला अडगळीत असलेल्या सरकारी प्राथमिक शाळांची डागडुजी करण्याची गरज आहे यासाठी शाळा सुधारणे साठी त्वरित निधी मंजूर करावा अशी मागणी देखील हेब्बाळकर यांनी केली.