Friday, April 19, 2024

/

‘कँटरची कारला धडक एक ठार एक जखमीं’

 belgaum

भरधाव वेगाने जाणारा कँटर नियंत्रण सुटल्याने डिवाईडर क्रॉस होऊन दुसऱ्या बाजूला आल्याने दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत कार मध्ये स्वार वृद्ध जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
गुरुवारी दुपारी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर यमनापूर ब्रिज वर हा अपघात घडला असून शशिधर एम अंगडी वय 75 रा. भाग्यनगर बेळगाव असे मयताचे नाव आहे. उत्तर रहदारी पोलीस स्थानकाचे निरीक्षक आर आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

 

 belgaum

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कँटर गाडी बेळगाव कडून कोल्हापूर कडे तर कार गोकाक हुन लग्न कार्यक्रम आटोपून बेळगाव कडे येत होती कँटरच गाडी वरील नियंत्रण सुटल्याने डीवाईडर क्रॉस करून विरुद्ध दिशेतून येणाऱ्या कारला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.कार चालक शिवू पाटील हा देखील जखमी झाला असून त्याच्या वर इस्पितळात उपचार सुरू आहेत.मयत शशिधर अंगडी हे कार चालकाच्या बाजूला बसले होते त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला.मयत अंगडी यांचा मुलगा डॉक्टर असून के एल इ इस्पितळात सेवेला आहे त्यांचं नाव डॉ नवीन अंगडी असे आहे अशीही माहिती मिळाली आहे. रहदारी उत्तर विभागात अपघाताची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.