संगोळी रायन्ना सोसायटीचा कारभाराला बळी पडलेल्या ठेवीदारांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे.मागील वर्ष भरापासून ठेवीदारांची धावपळ सुरूच आहे. त्यामुळे ठेवीदारांतून संतापाची लाट उसळली आहे.
बुधवारी काही पत्रकरांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संगोळी रायन्ना सोसायटी बाबत नाराजी असून ठेवीदारांचे ठेव कधी परत करणार असा प्रश्न विचारला असता जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण आता लवकरच सीआयडी कडे सोपविणार असल्याचे सुतोवाच्य करत याबाबत पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगितले आहे.
या सोसायटीचे ठेवीदार वारंवार मोर्चा आणि निवेदने देत आहेत मात्र अजूनही ते न्यायापासून वंचित आहेत त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. गोर गरीब जनतेने कबाड कष्ट करून संगोळी रायन्ना संस्थेत गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांच्या संचालक मंडळांनी ठेवीदारांचे ठेव व रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली आहे.
ज्या गोर गरीब जनतेने संगोळी रायन्ना पथ संस्थेत ठेवी ठेवल्या आहेत त्यांचे हाल जिल्हा प्रशासनाला यांची कल्पना आहे त्यामुळे त्या गरिबांची ठेव परत करण्यास प्रशासन पुढाकार घेत आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
संगोळी रायन्ना पथ संस्थेत मध्यमवर्गीय जनतेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत त्यामुळे गेली अनेक दिवस याबबत आंदोलने होत आहेत आता या प्रकरणाची चौकशी सी आय डी करणार असल्यानेपुन्हा एकदा ठेवीदारांच्या आशा काही प्रमाणात पल्लवित झाल्या आहेत.