भारतातील सर्वात जास्त विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था म्हणून ओळखली जाणारी मेरू कॅब बेळगावमध्ये दाखल झाली आहे.
प्रवाशांना आता या कॅब चा वापर करता येणार आहे. मेरू कॅब ऍप वरून किंव्हा फोन कॉल वरूनही ही कॅब बुक करता येणार आहे. सुरुवातीला ५० कॅब मिळणार आहेत, कालांतराने १०० पर्यंत कॅब वाढविल्या जाणार आहेत.आटोक्रसी ने हैराण झालेल्या नागरिकांसाठी ही एक खूषखबरच आहे.
ओला कँपनीने आपला दर वाढविला आहे, यामुळे स्वस्त दरात प्रवास करण्यासाठी मेरू हा चांगला पर्याय असेल.
०२२४४२२४४२२ या क्रमांकावर कॉल करून मेरू बुक करता येते. मेरुचे ऍप डाउन लोड करून किंवा www.meru.in वर जाऊनही बुकिंगची सोय आहे.
मेरुचा शहरातील फेरीसाठी ३९ रुपये बेसिक दर आहे. त्यापुढे प्रति किमिस ११ रुपये घेतले जातील. रात्रीचे दरही समान आहेत.
मेरुने आपल्या विश्वासार्ह प्रवासाच्या जोरावर नाव कमावले आहे. या कँपनीला मोठे पुरस्कारही मिळाले आहेत. बेळगाव शहर स्मार्ट होण्यासाठी आता मेरू हा पर्याय लोकांना महत्वाचा ठरणार आहे.