घरात कुणीही नसलेलं पाहून बंद घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केलेल्यास पोलिसांनी जर बंद केले आहे. शहरातील कॅम्प पोलिसांनी विशेष मोहीम आखून एका चोरट्यास गजाआड केले आहे. नाजीम मुल्ला वय २० रा. कोतवाल गल्ली बेळगाव से या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरात कुणी नसलेलं पाऊन बंद घराला कुलूप असलेले पाहून सदर व्यक्ती कुलूप तोडायचा आणि घरे लुटायचा अश्यास अटक करण्यात आली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अटक व्हायच्या अगोदरही त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या होत्या अनेक चोरींच्या प्रकरणात त्याचे समावेश होता.
पोलिसांनी नाजीम कडून साडे चार लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत कॅम्प पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.