कासियाच्या अध्यक्षपदी बसवराज जवळी या बेळगाव च्या उद्योजकाने एक मोठी झेप घेतली आहे. येथील बी जे इंडस्ट्रीज चे मालक आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी अध्यक्ष बसवराज जवळी यांची कर्नाटक स्मॉल स्केल इंडिस्ट्रीज असोसिएशन च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
जवळी हे बेळगावचे सुपुत्र आहेत. मागील वर्षी त्यांनी कासियाच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती.
यंदा ते अध्यक्ष पदावर निवडले गेले. जवळी यांनी बेळगावच्या उद्योग विश्वासाठी बरीच मोठी कामे राबवली आहेत. आता ते राज्यातील उद्योजकांचे मुख्य नेतृत्व म्हणून काम पाहणार आहेत.
भाजप नेते बी एस एडीयुरप्पा, मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी तसेच इतर नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे सबंध आहेत.
Trending Now