एकेकाळी जो वार्ड बॉय जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांची सुश्रुषा करत होता त्याच्यावरच आता दुसऱ्या वार्ड बॉय कडून त्याच इस्पितळात सुश्रुषा करून घेण्याची वेळ आली आहे.
त्या दुर्दैवी युवकांचे नाव राकेश कांबळे वय 22 वर्ष रा. बॉक्साईट रोड बेळगाव असे आहे.मंगळवारी सकाळी त्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश हा बिम्स मध्ये सिव्हील इस्पितळात कंत्राटी पद्धतीवर वार्ड बॉय म्हणून काम करत होता त्याला गेले नऊ महिन्या पासून पगार मिळाला नव्हता म्हणून निराशेतून त्याने विष प्राशन केले आहे.गेली दीड वर्षे तो वार्ड बॉय म्हणून काम करत होता या प्रकरणी ए पी एम सी पोलीस अधिक तपास करत आहेत.