खानापूर येथील माटोळी गावातील कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना आपणाला इच्छा मरण हवे आहे अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी ती परवानगी देणार तरी कशी? हा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूने अनेक शेतकऱ्यात नव्या आंदोलनाची दिशा दाखवून गेला.
आता पुन्हा काही शेतकऱ्यांनी इच्छा मरणाची परवानगी मागितल्याने सरकार समोरील पेच वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊस बिले देण्यास टाळाटाळ केली आहे.यामुळे अनेक शेतकऱ्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. याच मनस्तापातून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकरी आता इच्छा मरण मागत आहेत ही कोंडी फोडण्यात ही सरकार समोर मोठा पेच निर्माण होत आहे.
खानापूर व बैलहोंगल तालुक्यतील काही शेतकऱ्यांनी ऊस बिले मिळाली नाही म्हणून सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे सरकार दरबारी आता नवीन समस्या निर्माण होत आहे.
आपली ऊस बिले तातडीने देण्यात यावीत अशी मागणी करण्यात येते. यासाठी आंदोलने, निवेदनही देण्यात आली आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात सरकारने धन्यता मानली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता इच्छा मरणाबाबत सरकारकडे परवानगी मागितली आहे. जर सरकारने शेतकऱ्यांची उभा बिले तातडीने दिली नाहीत तर मोठ्याप्रमाणात ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे आणि त्याचा परिणाम सरकारवर होणार असून मोठे धर्म संकट निर्माण होणार आहे.