बेळगाव महा पालिकेचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर विसंबून न रहाता अनेक जण रस्त्यावरील खड्डे बुझवण्यास पुढाकार घेताना दिसत आहेत. गुडस शेड रोडवरील अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे बुझवण्याचे काम विमल फौंडेशनच्या अनुज लिखी आणि हणमंत जाधव या दोन युवकांनी केलं आहे.
गेले कित्येक दिवस गुडसशेड रोड वर चिखलाचे साम्राज्य असल्याने जरा जरी पाऊस पडला तर घसरगुंडी होत होती अनेक दुचाकी स्वारांचे लहान मोठे अपघात या रस्त्यावर होत होते.शासनाच्या वतीने केलेल्या खुदाई मुळे असे प्रकार इथे वारंवार घडत असताना स्वरूप नर्तकी जवळ रस्त्यात धोकादायक खड्डा निर्माण झाला होता याकडे पालिकेने दुर्लक्ष केलं होतं म्हणून अनुज लिखी आणि हणमंत जाधव या दोघांनी स्वतः पुढाकार घेऊन श्रमदानाने हे खड्डे बुझवले आहेत.
पालिका प्रशासनाची वाट न पाहता स्वतः श्रमदान करून केलेल्या या कार्याचा आदर्श इतरांनीही घेऊन छोट्या प्रमाणात का होईना रस्त्यांची डागडुजी केल्यास शहरातील बरेच रस्ते खड्डे मुक्त बनतील यात तीळमात्र शंका नाही.