देशात सर्वात खडतर मानली जाणारी आणि हिंदू धर्मात वेगळ महत्व असणाऱ्या अमरनाथ यात्रेस बेळगावातून ५० हून अधिक भाविक रवाना झाले आहेत.
रविवारी सायंकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर अमरनाथ यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूना शुभेच्छा देण्यात आल्या. गेली २० वर्षापासून बेळगावातून भाजी मार्केट येथील व्यापारीवर्ग आणि युवक या धार्मिक यात्रेत सहभाग नोंदवत असतात. यावर्षी देखील ५० जण या यात्रेत सहभागी होण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावरून मुंबई मार्गे रवाना झाले आहेत.
सोमनाथ हलगेकर यांच्या नेतृत्वात ५० युवक रवाना झाले आहेत श्रीराम सेनेच्या वतीने त्यांना रेल्वे स्थानकावर शुभेच्छा देण्यात आल्या. राम सेना जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर सह अन्य यावेळी उपस्थित होते.