बेळगाव महा पालिकेत जुने कर्मचारी हळूहळू सेवा निवृत्त होऊ लागले आहेत तशी महा पालिकेची जुनी ओळख देखील पुसट होत चालली आहे त्यातीलच एक जुने मन मिळावू अधिकारी ज्यांचा पालिके समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा आहे त्यात सिंहाचा वाटा असलेले अतिक्रमण हटावो पथकाचे अधिकारी अर्जुन देमट्टी हे सेवा निवृत्त झाले आहेत.गेली ३७ वर्षे त्यांनी बेळगाव महा पालिकेत अविरत सेवा बजावत आलेले आहेत.
शनिवारी सायंकाळी महा पालिकेच्या वतीने सेवा निवृत्ती निमित्य त्यांचा सत्कात करण्यात आला पालिकेच्या वतीने पालिका आयुक्त शशिधर कुरेर,महापौर बसप्पा चिखलदिनी,उपमहापौर मधुश्री पुजारी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.सत्कार केवळ पालिकेच्या वतीने असला तरी शकडो दलित संघटना आणि संघ संस्थांच्या पदाधिकारी देखील या सत्कारात सहभागी होते त्यांनीही सत्कार केला त्यावरूनच देमट्टी यांचा जनसंपर्क उपस्थितांच्या लक्ष्यात आला.
अर्जुन देमट्टी हे मुळचे खासबाग येथील राहणारे आहेत एक स्थानिक माणूस एक स्थानिक अधिकारी म्हणून त्यांची छाप पालिकेत होती अतिक्रमण हटाव मोहीम पथकाची जबाबदारी होती मनपा एस सी एस टी संघाचे ते प्रमुख होते.महा पालिके समोर आंबेडकर पुतळा बसवलाय त्यामध्ये त्यांचामोठा हात होता स्वतच्या अंगावर घेऊन त्यांनी पूर्ण जबाबदारी घेऊन त्यांनी हे काम केले हे कुणीच नाकारू शकत नाही.
एस सी एस टी कामगारांच्या समस्यांवर ते काम करायचे.अतिक्रमणे हटवताना त्यांना लोक विरोध करायचेतशा परिस्थितीत सुद्धा सांभाळून घेऊन त्यांनी काम करत होते एक चांगला सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता ही त्यांची खरी ओळख. अधिकारीपदावर राहून सामाजिक काम करीत ते राहिले अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया अधिकारी आणि संघ संस्थांच्या पदाधिकाऱ्यानी त्यांच्या सेवा निवृत्ती निमित्य काढल्या.
त्यांचे कार्य बघून सलग दोन वेळा आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष त्यांना करण्यात आलं होतं हे त्यांना दलित समाजाने दिलेला मान होता कुणाचेही काम असुदे, समाजाचं कुणाचंही काम असुदे सतत धावून येत होते. ३७ वर्षाच्या सेवेत बेळगाव मनपात काम करतांना कधीच त्यांनी आपण अधिकारी आहे म्हणून वागले नाहीत म्हणून ते भ्रष्ट अधिकाऱ्यांना डावलत मन मिळावू आणि लोकप्रिय अधिकारी ठरले यात तीळ मात्र शंका नाही. देमट्टी यांचे आदर्श पालिकेतल्या इतर अधिकाऱ्यांनी घ्यावेत हीच सदिच्छा…