नुकतेच ९८ वे अखिल भारतीय नाट्यसंम्मेलन झाले. या संमेलनात रंगलेले नाट्य काय होते याची बरीच चर्चा झाली. या संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमानंतर जास्त चर्चा झाली ती बिन बाईच्या तमाशाची. हा तमाशा सादर केला होता बेळगावचे कलाकार बालाजी चिकले यांनी…..
बालाजी चिकले यांनी हा किताब या नाट्य संमेलनात सार्थ ठरवला. काय आहे तो किताब? बिन बाईचा तमाशाकार! तमाशा म्हणजे त्यात नाचणारी बाई ही आलीच. अनेक वर्षे स्त्रियांनी सादर करायची आणि पुरुषांनी समोर बसून फेटे उडवत बघत बसायची ही कला. समोर बसून टाळ्या आल्या आणि शिट्ट्याही. मग बालाजी एक पुरुष असून या कलेत काय करतो आहे? तमाशा आणि त्यातली लावणी रंगवण्यासाठी बालाजी त्यात चक्क स्वतः बाई होतो आहे. आहे ना कमाल? होय बालाजी चक्क बाई होऊन हा तमाशा रंगवतोय. मागील दहा वर्षांपासून त्याने ही कला जपली आहे, फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशात ती पसरवली आहे. म्हणूनच बालाजीला थेट संधी मिळाली अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात ठेका धरायची. त्याने व्यासपीठ हलवले, प्रेक्षकांनी ते उचलून धरले, शिट्ट्याही वाजल्या. अरे कार्यक्रमाचे हे कसले नाव? म्हणे बिन बाईचा तमाशा, इथे तर इतकी सुंदर स्त्री तमाशा सादर करत आहे, रसिक प्रेक्षकही प्रश्नांत बुडाले होते, नंतर कळले ही खरीखुरी बाई नाही, तर बाईच्या वेशात, बाईच्या तोडीस तोड नाचणारा पुरुष आहे, बालाजी आहे.
नाट्य संमेलनात प्रेक्षकांची जी गट झाली तशी अवस्था सगळीकडेच होते. कारण बालाजी एकदा स्त्री वेशात गेला की ओळखता येत नाही हा पुरुष आहे आणि बाई नाही म्हणून. हीच त्यांची कमाल आहे. पूर्णपणे पुरुष असलेला, विवाहित असलेला बालाजी आपल्या मुलांचा पिताही आहे. तो उद्योजक आहे. वैदयकीय कारणांसाठी लागणाऱ्या वस्तूंची तो विक्री करतो. एका छंदापाई तो या क्षेत्राकडे वळला आणि त्याने लाटांविरुद्ध पोहत आपले तर नाव केलेच शिवाय स्वतःच्या गावाचेही नाव केले आहे.
बालाजी बेळगाव जवळील अतिवाड गावचा रहिवासी. आयटीआय करून नोकरीच्या शोधात मुंबईला गेला. तिथे राहायचे, जेवायचे वांधे असताना आपली कला जोपासत गेला. स्त्री प्रमाणे लावणी शिकून या क्षेत्रात प्राविण्य मिळवले आणि आज तो ठरलाय बिन बाईचा तमाशाकार.
बालाजीला बेळगाव live च्या हार्दिक शुभेच्छा.