गेली पाच वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकार अस्तित्वात येताच पहिल्या बजेट मध्ये बेळगावात सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलसुरु करू अशी घोषणा करण्यात आली होती पहिल्या वर्षीच बजेट मध्ये तरतूद ठेऊन मंजुरी देण्यात आली होती मात्र अध्याप या बद्दल कामाची सुरुवात कधी होणार याबद्दल काहीच होत नव्हत मात्र याबाबत आता वेळ जुळून आली असून वैद्यकीय शिक्षण मंत्री डी के शिव कुमार पुढी आठवड्यात या बेळगावातील नियोजित इस्पितळाचे कामाची सुरुवात करणार आहेत
राज्य सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या सुपर मल्टी स्पेशालिटी इस्पिताळाचे निर्माण करण्यास राज्य सरकारने १८० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. सीव्ही इस्पितळ इमारतीच्या शेजारी असलेली जुन्या इमारतीती हे इस्पितळ सुरु केले जाणार असून जुनी इमारत पाडवण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.
या सुपर मल्टी स्पेशल इस्पितळात २०० बेड आणि ९० बेड लहान मुलांच्या वार्ड सह कार्डियालॉजी,न्युरोलॉजी सह अनेक अत्याधीनिक सुविधांनी सुसज्ज असे असणार आहे. अनेक प्रकारच्या हायटेक सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
पुढील आठवड्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री डी के शिवकुमार या इस्पितळाचे भूमिपुजन करणार असून या कार्यक्रमात जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह अनेक आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती बीम्स चे संचालक डॉ कळसद यांनी दिली आहे.सदर इस्पितळ व्हावे यासाठी माजी पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भरपूर प्रयत्न केले होते बेळगावातील खाजगी इस्पितळांची मोनोपोली मोडून काढायची असल्यास श्या सरकारी सुपर मल्टी स्पेशालिटी इस्पितळाची गरज बेळगावात नक्कीच होती अशी भावना देखील लोकातून व्यक्त केली जात आहे. “