गणपती बाप्पा मोरया च्या गजरात वेध लागले ते आता गणपती बाप्पाच्या आगमनाचे. अवघ्या दोन महिन्यावर गणेशोत्सव येवून ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्रच मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. यामुळे सारेच मूर्तीकार गणेशमूर्तीच्या लगबगीत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सर्वच मूर्तिकार मातीच्या मूर्ती तयार करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने घातलेल्या दंडकामुळे सारेच मूर्तिकार मातीची मूर्ती तयार करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मात्र यावर्षी मातींच्या मूर्तीकडे साऱ्यांनीच भर देत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगावातील गणेशोत्सव हा पूणे आणि मुंबईच्या धर्तीवर साजरा करण्यात येतो. मागील वर्षीपेक्षाही यावर्षी मूर्तींच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मूर्ती बनविण्याच्या साहित्याच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी तर घरगुती मूर्ती सांगण्यास आतापासूनच सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन वर्षापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींची मागणी अधिक प्रमाणात होती. मात्र प्रशासनाने प्रदूषणाचा विचार करून त्यावर निर्बंध घालण्यात आल्याने याकडे कानाडोळा करण्यात आला. मात्र याबाबत मुर्तीकारानी आवाज उठवला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे मागील वर्षीपासून मातिच्या मूर्ती बनविण्यावर भर दिला जात आहे. अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या तयारीची धामधूम आतापासूनच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
गणराय ही विध्येची देवता आहे. गणरायाची पूजा मनोभावाने केली की त्याचे फळ नक्कीच मिळते असे लोक मानतात. या देवतेचे पूजन प्रत्येकाच्या घरी आणि सार्वजनिक मंडपात करण्याची पद्धत रूढ आहे.
बेळगावला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप भव्य आहे. दहा ते अकरा दिवस चालणारा उत्सव आणि शेवटच्या दिवशी होणारी विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी बाहेरून लोक येतात, अशा या उत्सवाला चांगल्या मूर्ती मिळाव्या म्हणून गणेशभक्त आणि मूर्तिकार कामाला लागले आहेत.