समर्थ नगर येथे दुचाकी जाळणाऱ्या दोघा संशयितांना आज मार्केट पोलिसांनी अटक केली. पूर्ववैमनस्यातून त्यांनी या दोन दुचाकी पेटविल्याची माहिती मिळाली आहे. विनायक प्रकाश गेंजी(27 मराठा गल्ली दुसरा क्रॉस महाद्वार रोड) व दिपक शांताराम पाटील (29 तांगडी गल्ली कपिलेश्वर कॉलनी)अशी त्यांची नावे आहेत.
24 रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास समर्थनगर येथे राकेश प्रकाश माने यांच्या घरासमोरील दोन दुचाकी अज्ञातांनी पेटविल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेची पोलिसांत नोंद झाली होती. गेल्या चार दिवसांपासून पोलिसांकडून याचा तपास सुरू होता. आज उपरोक्त दोघा संशयितांना अटक केली. विनायकव; माने कुटुंबियात पूर्वी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता याच विनायकने दिपकला सोबत घेऊन या दुचाकी पेटविल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.मार्केटचे प्रभारी पोलिस निरीक्षक रमेश हुगार अधिक तपास करीत आहेत.